हे तर चोरांचे आणि खुन्यांचे सरकार ; परमबीर सिंग यांच्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

CM Uddhav Thackeray - Parambir Singh - Prakash Ambedkar

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांचा लेटरबॉम्ब पडला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पत्रामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) ठाकरे सरकारवरच (Thackeray Government) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. त्याचसंदर्भात आता वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त करण्याची मागणी आम्ही राज्यपालांना करणार आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे परबीर सिंग यांच्या पत्रामधील दावे राजकीय घडामोडींसाठीदेखील कारणीभूत ठरले आहेत.

आपण सोमवारी दुपारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण आणि प्रशासनातले गुन्हेगारी घटक एकत्र येऊन काय काय करू शकतात, हे आपण पाहतो आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले हे स्पष्ट केलं आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. पण हे नेक्सस उभं राहिलेलं आहे. २२ तारखेला सोमवारी १२.१५ वाजता राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. आम्ही भेटून आमची बाजू मांडणार आहोत. तसेच, हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे हे दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER