हे सुंदर दृश्य आहे धर्मेंद्रच्या फार्म हाऊसचे

Dharmendra farm House

बॉलिवुडमध्ये (Bollywood) ही मॅन म्हणून ओळखला जाणारा धमेंद्र (Dharmendra) अॅक्शन स्टार असला तरी त्याचे मन फार हळवे आहे. त्याला शेरोशायरीची आवड असून त्याच्याशी गप्पा मारताना तो मध्ये मध्ये शेरोशायरीची पखरण करीत असतो. त्याच्याशी गप्पा मारताना एक वेगळी मजा असते. त्यातही संध्याकाळची वेळ असेल तर मग बघायलाच नको. केवळ शेरोशायरीच नव्हे तर त्याला शेतीही करायला आवडते तसेच तो आधुनिक गोष्टींचाही वापर करण्यात अग्रेसर आहे. या वयातही धर्मेंद्र सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव्ह आहे.

कोरोनाकाळ सुरु झाल्यापासून धर्मेंद्र आपल्या फार्म हाऊसवरच (Farm House) राहात आहे. फार्म हाऊसवर कामे करतानाचे अनेक व्हिडीयो धर्मंद्रने सोशल मीडियावर टाकले होते आणि त्याच्या आजही असलेल्या लाखों प्रशंसकांनी ते व्हिडियो लाईकही केले आहे. धर्मेंद्रने नुकताच सोशल मीडियावर त्याच्या फार्म हाऊसचा एक फोटो टाकला आहे. या फोटोत त्याच्या फार्म हाऊसचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

या फोटोसोबत धर्मैंद्रने अत्यंत सकारात्मक अशी कॅप्शनही दिली आहे.  मेरे फार्म पर अपनी शफकत के रंग बिखेरता, डूब होता सूरज जैसे कहते हुए ओझ रहा है ‘धरम, अपना ख्याल रखना मैं कल सुबह फिर लौटुंगा.”  धर्मेंद्रच्या या फोटोलाही प्रचंड लाईक्स मिळालेले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही लाईक करावेसे वाटेलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER