ही घटना मनाला वेदनादायी ; पंतप्रधान मोदींनी भंडाऱ्यात 10 बाळांच्या मृत्यूमुळे व्यक्त केले दु:ख

Bhandara - PM Narendra Modi

मुंबई :- महाराष्ट्रातील भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात आग लागल्यामुळे गुदमरुन 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीव्र दुख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून भंडाऱ्यातील घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER