बिनधास्त चुंबनदृश्य देणाऱ्या नायिकांमध्ये ‘ही’ नायिका आहे अव्वल

Heroines

हॉलिवूड चित्रपटांमध्ये चुंबनदृश्यांसह खुली अंगप्रदर्शनाची अनेक दृश्ये असतात. बॉलिवूडमध्ये मात्र सेंसॉरशिपमुळे अशी दृश्ये प्रतीकात्मक रूपात दाखवली जात. परंतु कलाकारांची नवी पिढी आधुनिक असल्याने ते पडद्यावर बिनधास्त चुंबनदृश्ये देतात. सेंसॉर बोर्डही आता उदार झाल्याने चुंबनदृश्यांना बिनधास्त परवानगी देते. मात्र चुंबनदृश्य कथानकाचा भाग असावे आणि आठ सेकंदांच्या वर नसावे अशी अटही घातलेली आहे. याचा फायदा अनेक निर्माते सध्या बिनधास्त घेत आहेत.

बॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिले चुंबनदृश्य देविका राणी यांनी १९३३ मध्ये ‘कर्मा’ चित्रपटात दिलेले होते. हिमांशु रॉयसोबतचे त्यांचे हे दृश्य आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त लांबीचे चुंबनदृश्य मानले जाते. जवळ-जवळ ४० सेकंदांचे हे चुंबनदृश्य आहे. त्यानंतर गेल्या दोन दशकांपासून चुंबनदृश्यांची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि आता त्यात आणखी वाढ होत असल्याचे दिसते. देविका राणी यांच्या चुंबनदृश्याबरोबरच माधुरी दीक्षितने ‘दयावान’ चित्रपटात विनोद खन्नाला दिलेले चुंबनदृश्य प्रचंड गाजले. या चुंबनदृश्याच्या वेळी विनोद खन्ना प्रचंड आक्रमक झाला होता आणि त्याने माधुरीचा ओठ चावल्याचे सांगितले जाते. माधुरीला प्रचंड राग आला होता; परंतु नायकप्रधान चित्रपटसृष्टी असल्याने तिच्या रागाला कोणी भीक घातली नाही. हे चुंबनदृश्य ठेवू नये असेही तिने निर्माता फिरोज खानला सांगितले होते. परंतु त्याने तिचे ऐकले नाही आणि चित्रपटात ते दृश्य ठेवले होते. सेंसॉर बोर्डानेही त्या दृश्यावर कात्री चालवली नव्हती.

करिश्मा कपूर आणि आमिर खानचे ‘राजा हिंदुस्तानी’मधील चुंबनदृश्यही असेच प्रचंड गाजले होते. खरे तर आमिर खान अशा दृश्यांना तयार नसतो; परंतु इंद्रकुमारने त्याला तयार केले आणि चुंबनदृश्य करण्यास भाग पाडले होते. इमरान हाशमीलाही सीरियल किसर म्हणून ओळखले जाते. त्याच्या प्रत्येक चित्रपटात नायिकेसोबत चुंबनदृश्य असतेच.

नव्या पिढीच्या नायिकांना मात्र चुंबनदृश्यांवर आपत्ती नाही. अगदी ऐश्वर्या, कॅटरीनापासून ते आलियापर्यंत जवळ जवळ सर्वच नायिकांनी पडद्यावर चुंबनदृश्ये दिलेली आहेत. ऐश्वर्याने हृतीक रोशनसोबत ‘धूम’मध्ये चुंबनदृश्य दिले तर कॅटरीनाने ‘बंग बँग’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये हृतीकसोबत चुंबनदृश्य दिले होते. काजल अग्रवालने रणदीप हुडासोबत ‘दो लफ्जों की कहानी’मध्ये चुंबनदृश्य देऊन बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. दक्षिणेत काजलने अनेक चित्रपट केले; परंतु ती चुंबनदृश्यांपासून लांब होती. जॅकलीन फर्नांडिसने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत ‘जंटलमेन’ चित्रपटात चुंबनदृश्य दिले तर कृती सेननने ‘राबता’ चित्रपटात सुशांत सिंहसोबत चुंबनदृश्य दिले होते. सारा अलीनेही ‘केदारनाथ’ चित्रपटात सुशांतबरोबर चुंबनदृश्य दिले होते. साराने पुन्हा कार्तिक आर्यनसोबत ‘लव आज कल’ चित्रपटात चुंबनदृश्य देऊन आपण अशा चुंबनदृश्यास वारंवार तयार आहोत हे दाखवून दिले. दीपिका पदुकोनने रणबीरसोबत गोलियों की रासलीला रामलीला, तमाशा आणि यह जवानी हैं दीवानी चित्रपटात चुंबनदृश्य केले होते. बेफिक्रेमध्ये वाणी कपूरने रणवीर सिंहसोबत चुंबनदृश्ये दिलेली आहेत. कंगनानेही जॉन अब्राहमसोबत शूटआउट अॅट वडालामध्ये चुंबनदृश्य दिलेले आहे.

या सर्व नायिकांमध्ये चुंबनदृश्य देण्यात आलिया भट्ट आघाडीवर आहे. आजवर जवळ-जवळ सहा चित्रपटांमध्ये आलियाने चुंबनदृश्ये दिलेली आहेत. ‘हायवे’ चित्रपटात रणदीप हुडासोबत आलियाने चुंबनदृश्य दिले. त्यापूर्वी ‘2 स्टेट्स’मध्ये अर्जुन कपूरसोबत चुंबनदृश्य केले होते. शानदार आणि उडता पंजाब चित्रपटात शाहिद कपूरसोबत, हम्प्टी शर्मा की दुल्हनियांमध्ये वरुण धवनसोबत, गलीबॉयमध्ये रणवीर सिंहसोबत एक-दोन नव्हे तर तीन चुंबनदृश्ये आलियाने दिली होती. आणि आता नुकत्याच आलेल्या सडक-२ मध्येही सिद्धार्थ रॉय कपूरसोबत आलियाने चुंबनदृश्य दिलेले आहे. त्यामुळे आलियाला बॉलिवूडमध्ये सीरियल किसर म्हटले जाऊ लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER