ट्रोलर्सना ट्रोलना ही नायिका वाईट वाटून घेत नाही

Janhvi Kapoor

सोशल मीडियावर कलाकार नेहमी काही ना काही शेअर करीत असतात. यात कधी त्यांचे वैयक्तिक कार्यक्रमाचे फोटो असतात, कधी नव्या चित्रपटाची माहिती असते तर कधी प्रेमाचे क्षणही शेअर केलेले असतात. सध्या तर लग्नाचे आणि हनिमूनला गेले असतानाचेही फोटो शेअर करण्याचे फॅड निर्माण झाले आहे. मात्र यामुळे कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. ट्रोलर्सच्या ट्रोलला कंटाळून करण जोहर (Karan Johar), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी काही दिवस सोशल मीडियामधून एक्झिट घेतली होती. आता त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट पर्सनल केल्याने ट्रोलर्सना त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देता येत नाही. एकीकडे असे असताना जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) मात्र ट्रोलर्सच्या ट्रोलचे वाईट वाटून घेत नाही असे म्हणत ट्रोलर्सना सामोरे जाण्यास सज्ज असते.

अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी असलेल्या जान्हवीला तिच्या पहिल्या ‘धडक’ सिनेमापासूनच ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. जान्हवीच्या कपड्यांवर आणि ती एकच ड्रेस किती वेळा घालते यावर लक्ष ठेऊन तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. ट्रोल होण्याबाबत बोलताना जान्हवीने सांगितले, माझ्या पहिल्या चित्रपटापासूनच मी ट्रोल होत आली आहे. परंतु ट्रोलर्समुळे मी स्वतःवर त्याचा परिणाम होऊ देत नाही. त्यांच्या गोष्टींचे मी वाईट वाटूनही घेत नाही. ट्रोलर्स जेव्हा माझ्या एखाद्या गोष्टीवर मला ट्रोल करतात तेव्हा ते माझ्या भल्यासाठीच असते असे मला वाटते आणि त्यातून मी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. ट्रोलर्समुळेच मी जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करते असेही जान्हवीने सांगितले होते.

काल म्हणजे रविवार जान्हवीने कत्थकचा अभ्यास करतानाचा एक व्हीडियो शेअर केला. या व्हीडियोत तिची बहिण तिच्या डान्स स्टेप्स पाहाताना दिसत आहे. हा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला असून तिच्या प्रशंसकांना तिच्या नृत्याच्या स्टेप्स आवडलेल्या असल्याचे दिसत आहे. या व्हीडियोसोबत जान्हवीने लिहिले आहे, तुम्हा सगळे माझा हा परफॉर्मन्स पाहून माझ्या बहिणीपेक्षा जास्त आनंदी व्हाल.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER