‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये हा नायक दिसणार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

This hero will be seen in the role of Shivaji Maharaj in 'Sarsenapati Hambirrao'

पडद्यावर शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj)भूमिका साकारण्याची बहुतेच सगळ्या कलाकारांची इच्छा असते. पण शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे हे शिवधननुष्य पेलण्यापेक्षा कमी नाही. पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांची भूमिका सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे यांनी साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्या काळी शिवाजी महाराज म्हटले की प्रेक्षकांना या दोघांचेच चेहरे आठवत असत. त्यानंतर शांतनू मोघे, अमोल कोल्हे, शरद केळकर, महेश मांजरेकर, चिन्मय मांडलेकर अशा अनेकांनी शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारली आहे. या यादीत आता आणखी एका नव्या तरुण नायकाची भर पडणार आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao)सिनेमा तयार करीत आहे. प्रविणने ‘मुळशी पॅटर्न’ हा एक अत्यंत संवेदनशील, सामाजिक चित्रपट दिला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने कमाल केली होती. या सिनेमाच्या लोकप्रियतेने सलमानलाही भुरळ घातली आणि त्याने याची हिंदी रिमेक ‘अंतिम’ या नावाने सुरु केली. महेश मांजरेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करीत असून यात सलमानसोबत नायक म्हणून सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा दिसणार आहे. हाच प्रवीण आता ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमातील कलाकारांविषयी प्रचंड उत्सुकता होती. सगळ्यात जास्त उत्सुकता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण असेल याची होती. शुक्रवारी शिवजयंतीच्या मुहुर्तावर प्रवीणने शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या कलाकाराच्या नावाची घोषणा केली आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीणच करीत असून अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गश्मीर हा आजच्या तरुण पिढीतील नायक असून तो प्रख्यात अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. गश्मीरने डोंगरी का राजा, पानीपत या हिंदी सिनेमासह देऊळ बंद, बोनस, वन वे तिकीट अशा सिनेमात काम केलेले आहे. शिवाजी महाराजांची भूमिका त्याने कशी साकारली आहे हे आता सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER