या नायकाला मिळाली होती बायकोकडून धमकी

akshay kumar

चांगले चित्रपट केले नाहीस तर दुसऱ्या बाळाला जन्म देणार नाही प्रत्येक लग्न झालेल्या पुरुषाला पत्नीची भिती वाटतच असते. त्यामुळे पत्नी नाराज होऊ नये म्हणून पती सर्वतोपरी काळजी घेत असतो. मग तो पति बॉलिवुडमधला सुपरस्टार असो वा एखाद्या कंपनीत असलेला क्लार्क. आता तुम्ही म्हणाल हे काय. पती-पत्नीच्या कथा आम्हाला कशाला वाचायला लावता आम्हाला याचा अनुभव आहेच. पण तुम्हाला कधी तुमच्या पत्नीने अशी धमकी दिली नसेल. चांगले काम केले नाही तर मी दुसऱ्या बाऴाला जन्मच देणार नाही. आता तुम्ही म्हणाल अशी धमकी कुठली बायको आपल्या पतीला देईल. तर अशी धमकी बॉलिवुडच्या सुपरस्टारला त्याच्या पत्नीने दिली. आणि त्याने त्या धमकीकडे गंभीरतेने लक्ष दिले.

हा अभिनेता आहे अक्षयकुमार. हे नाव वाचूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण चित्रपटात अक्षयचे जे रूप दिसते त्यापेक्षा वेगळे असे त्याचे वर्तन आहे. बरं हे आम्ही कुठून तरी ऐकलेले नाही तर स्वतः अक्षयनेच या गोष्टीचा एका टीव्हीवरील कार्यक्रमात केला होता. अक्षय आणि ट्विंकलचा प्रेम विवाह झाला होता. ट्विंकल ही बॉलिवुडचा सुपरस्टार राजेश खन्ना आणि बॉबी गर्ल डिंपलची मुलगी. ट्विंकलनेही काही हिंदी चित्रपटात काम केले. अक्षयबरोबर लग्न झाल्यानंतर मात्र ट्विकंलने चित्रपटात काम करणे सोडले होते. अक्षय सुरुवातीला कोणतेही चित्रपट करायचा.

त्यामुळे नाराज झालेल्या ट्विंकलने अक्षयला धमकी दिली की, जर तू चांगले चित्रपट केले नाहीस तर मी दुसऱ्या बाळाला जन्मच देणार नाही.  ट्विंकल जे बोलते ते करते हे अक्षयला ठाऊक असल्याने त्याने आपला मार्ग बदलला आणि कथा निवडून चित्रपट करू लागला. त्याचे सर्व चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि तो सगळ्यात जास्त कमाई करणारा स्टार बनला. हे सर्व ट्विंकलमुळेच झाल्याचेही त्याने या कार्यक्रमात म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER