हे सरकार तुमचं, मुंबईच्या विकासासाठी टीकेची पर्वा करणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. सोबतच राज्यातील विकासाबाबतही भूमिका स्पष्ट केली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्याची बदनामी करण्याचे कारस्थान केले. आरेतील कार डेपो कांजूरमार्ग येथे हलवला. मात्र ही मीठागाराची असल्याचे सांगून संभ्रम निर्माण केला. ही जागा राज्य सरकारचीच असून, यावरून काही जणांनी मुंबईच्या प्रकल्पातील कामात मिठाचा खडा टाकण्याचे काम केले. मात्र मुंबईकरांच्या हिताचे जे असेल ते टीकेची पर्वा न करता काम पूर्ण करणार करणार, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागाराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आज त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी सर्वांना करोनाची लाट पुन्हा येऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचं आवानही त्यांनी केलं.

यावेळी ते म्हणाले की, मुंबईच्या कारशेडचा विषय वेगळा आहे. सर्वांना एक सांगावसं वाटत आहे. जर्मनीच्या एका कंपनीकडून आपण ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे. आम्हाला महाराष्ट्र सोयीस्कर वाटतो असं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे राज्यातील जनतेच्या मेहनीचं फळ आहे. असंही त्यांनी सांगितलं. महिलांसाठी आपण लोकल सेवा सुरू केल्या आहेत. सर्वांसाठी लोकल सुरू करण्यावर केंद्राशी चर्चा सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील उत्तम सहकार्य करत असल्याचंही त्यानी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER