
पुणे : महाविकास आगाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असल्याचे दावे प्रतिदावे विरोदी पक्ष भाजपचे नेते वारंवार करत असतात. मात्र, या आघाडी सरकारने नुकतीच वर्षपुर्ती केली. या पार्श्वभूमीवर पुन्हा हे सरकार लवकरच कोसळेल अशी आरोळी विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे. विरोधकांच्या टीकेला महाविकास आघाडीचे मंत्री, राष्ट्रवादीचे (NCP) नेते धगन बुजबळ यांनी भाष्य केले आहे.
“हे सरकार पाच वर्षे चालेल, आणि पुढच्या निवडणुका एकत्र लढवून पुन्हा हे सरकार रिपीट होणार” असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
भुजबळ म्हणाले, “एका पक्षाचे सरकार असलं तरी कुरबुर होतेच, हे तर तीन पक्षाचे सरकार आहे. भाजपमध्येही (BJP) कुरबुरी चालूच असतात ना? तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या कुरबुरी चालणारच. कोरोनामुळे (Corona) कोणी कोणाला भेटत नाही, आम्ही व्हीसीद्वारे भेटत असतो”
“विरोधक आपले कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, म्हणून लॉलिपॉप देतात, मात्र हे सरकार 100 टक्के पाच वर्ष पूर्ण करणार. त्यानंतर सर्व निवडणुका एकत्र लढू, हे सरकार परत रिपीट होईल. लहान लहान गोष्टींमुळे सरकार पडणार नाही, सरकार कोरोनानंतरही चांगले काम करेल” असा विश्वास छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला.
अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती, हे सरकार लवकरच कोसळणार : राम शिंदे@RamShindeMLA @BJP4Maharashtra @mipravindarekar #ramshinde #pravindarekar #bjp #mvagovthttps://t.co/5qvkfz67XZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
“आडवे येणाऱ्यांना आडवे करु, अशी शिवसेनेची भाषा पहिल्यापासून आहे. राजकारणात प्रत्यक्षात कोण कोणाला आडवं करत नाही, हा सांकेतिक शब्द आहे” असंही भुजबळ म्हणाले.
तसेच, “कोरोना काळात सरकारने उत्तम काम केले. धारावी आणि मुंबईसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल युनो आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनीही घेतली. आम्ही जनतेपर्यंत धान्य पोहोचते केले. 9 लाख टन धान्य राज्य सरकारने जनतेपर्यंत दर महिन्याला दिले. शिवभोजन थाळी पाच रुपयात कोरोना काळात दिली, त्याचा गरजवंतांना उपयोग झाला. अडचणीत सरकारने चांगले काम केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याचं आम्ही स्वागतच करतो” असंही भुजबळ म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला