‘हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं’, जाधव यांच्या तडीपारीवरून मनसे आक्रमक

Sandeep Deshpande Avinash Jadhav

ठाणे : मनसेचे (MNS) ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पालघर जिल्हा, ठाणे ग्रामीण, ठाणे, नवी मुंबई, मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची नोटीस शुक्रवारी बजावण्यात आली. त्यानंतर मनसेने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया”, असं आव्हान मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Despande) यांनी दिलं आहे.

याबाबत सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, “अविनाश जाधव यांना पोलिसांकडून काल तडीपारीची नोटीस (Norice) तर दिलीच, पण त्यांच्यावर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढण्यात आल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, हा त्यांचा गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत या सरकारची हुकूमशाही वाढत आहे”. असा आरोपही केला.

ही बातमी पण वाचा : अविनाश जाधव यांना त़डीपारची नोटीस; मनसेकडून उद्धव ठाकरे सरकारचा निषेध

असे गुन्हे दाखल करुन आम्हाल गप्प बसवता येईल असं सरकार आणि पालकमंत्र्यांना वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असं देशपांडे म्हणाले. आज आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनार्थ ठाण्याला जातोय. आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठिशी आहोत, आम्हाला कोण अडवतंय ते बघायचं आहे, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं.

दरम्यान, ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही. कोव्हिडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केले. आकासापोटी ही कारवाई करण्यात आलेली आहे, असं मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER