हे सरकार आमच्यामुळे आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सेना-राष्ट्रवादीला सुनावले

Maharashtra Today

मुंबई : २०१९मध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन विरोधी विचारसरणीच्या पक्षांचे राज्यात सरकार आले. यात काँग्रेस ‘बिचारा’ ठरला आहे. अधेमधे त्यांच्यातले मतभेद उघड होत असतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असेच झाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले – हे सरकार आमच्यामुळे आहे (This government is because of us), आम्ही सरकारमुळे नाहीत.

राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचे स्थान याविषयी बोलताना नाना पटोले (Nana Patole)अभिनेता राजकुमाराच्या स्टाईलमध्ये म्हणालेत – आम्ही याआधीही अनेकदा सांगितले आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितले आहे. आमची सरकारमध्ये फार मोठी भागीदारी नाही पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार (Ajit Pawar)यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचे नातं जोडले गेले आहे.

तिन्ही पक्षांचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर ठरवण्यात आलेल्या किमान समान कार्यक्रमाचे नक्की राज्यात काय झाले? समन्वय ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीमध्येच समन्वय आहे की नाही? यावर देखील नाना पटोले यांनी भूमिका मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button