मती, गती आणि प्रगती असे हे सरकार , बारामती नव्हे : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई :- सरकार तीन पक्षाचं आहे. या सरकारमध्ये मती आणि गती आहे. मती, गती आणि प्रगती असं हे सरकार आहे. बारामती नव्हे, बारामती वेगळी. नवीन गोष्टी येत आहेत. सध्या राज्यातील परिस्थिगेली आहे ती समाधानकारक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’अंतर्गत वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे. गेल्या सहा महिन्यांत करोनाकाळात एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाच्या वतीने २५ भारतीय कंपन्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली .

करोना संकटकाळातही उद्योजकांनी महाराष्ट्रावर विश्वास दर्शवत मोठी गुंतवणूक केली आहे. उद्योग विभागाने कमी कालावधीत दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण केले, ही अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे.”

काही लोकांनी मला उद्घाटनाला बोलावलं, तुम्ही मला २०२१, २०२२ आणि २०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावलं तर मी कसे नाही म्हणणार?, असे मुख्यमंत्री बोलताना म्हणाले. त्यांच्या या प्रश्नार्थक विधानाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यानी लगेच बाजू सावरली. हा एक विनोदाचा भाग झाला. मात्र, महाराष्ट्र सरकार नेहमी गुंतवणुकदार आणि उद्योजकांसोबत खंबीरपणे उभं राहील, असा मी विश्वास देतो”, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : जयंत पाटलांसंदर्भात काही तक्रारी असतील तर मुख्यमंत्री सोडवतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER