हे सरकार ‘मिनिमम कॉमन हिंदुत्वा’वर गेले आहे; संदीप देशपांडेंचा टोमणा

Sandeep Deshpande - CM Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले त्या वेळेस ‘मिनिमम कॉमन प्रोग्राम’ ठरला होता; पण हे सरकार आता ‘मिनिमम कॉमन हिंदुत्वा’वर गेले आहे, असा टोमणा मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मारला.

मंदिरं खुली करण्यावरून सुरू असलेल्या वादात आता मनसेने (MNS) देखील उडी घेतली आहे. राज ठाकरेंनी दीड महिन्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. राज्यात मॉल उघडले जातात मग मंदिरे बंद का, असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला. कोरोनासारख्या संकटाच्या काळात देवाचा आधार असतो. यामुळे मंदिरं उघडली गेली पाहिजेत, असे देशपांडे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरदेखील टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि १००१ रुपये मिळवा, असे ट्विट संदीप देशपांडेंनी केले होते.

फेसबुकवर (Facebook) घोषणा करणारे सरकार
आंदोलन करून सरकारला अक्कल येत नसेल आणि सरकारला डोके नसेल तर आपण तरी काय करणार? हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारे आहे; प्रत्यक्षात काहीच केले जात नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER