ओबीसींच्या मतांवर हे सरकार आलं, मात्र ओबीसींवरच अन्याय; राज्यभर आंदोलन करण्याचा बावनकुळेंचा इशारा

Chandrashekhar Bawankule

नागपूर : आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने (SC)दिलेल्या निर्णयाने ओबीसींमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपले आहे. या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bavankule) यांनी केली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. आरक्षणावरून त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारे ओबीसींना आरक्षण दिले. यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. न्यायालयाच्या सूचनेकडेही त्यांनी लक्ष दिले नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आयोगाची स्थापना केली नाही. हे दुहेरी दर्जाचे सरकार आहे. ओबीसींच्या मतांवर हे सरकार आले. मात्र ओबीसींवरच अन्याय करत आहे. दुटप्पी भूमिकेविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे, असा इशारा देताच आरक्षणाशी केंद्राचा संबंध नाही. हा राज्याचा विषय आहे. सरकार खोटं बोलत आहे. सरकारने तातडीने डेटा तयार करावा. महिन्याभरात आयोग स्थापन करून तीन महिन्यात डेटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टात दाखल करा, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button