हे सरकार हिरण्यकश्यपचे; दारूची दुकाने उघडी, पण मंदिरे बंद! वारकरी संप्रदायाची टीका

Prakash Ambedkar - CM Uddhav Thackeray - Ganesh Maharaj Shete

अकोला : ‘देशी दारूची दुकाने आज उघडी आहेत, पण मंदिरे बंद आहेत, हे हिरण्य कश्यपचे सरकार आहे, या शब्दात वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली. ३१ ऑगस्टला सरकारला जाग करण्यासाठी पंढरपूरला एक लाखाच्या जवळपास वारकरी ठिय्या आंदोलन करतील अशी घोषणा त्यांनी पत्रपरिषदेत केली. पत्रकार परिषेदेत वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणालेत, वारकऱ्यांमध्ये आता महात्मा गांधी जिवंत झाले आहेत आणि ते ३१ तारखेला आंदोलन करतील. मी मुख्यमंत्री असतो तर कोरोना संपला असं जाहीर केले असते. सरकारने अनलॉक प्रक्रिया केली नाही, तर लोकच अनलॉक करत आहेत. सरकारने लॉकडाऊन (Lockdown) केले परंतु अनलॉक करण्याची चावी त्यांना सापडत नाही.

एसटीमध्ये ई-पास लागणार नाही, परंतु खासगी गाडीला ई-पास लागतो, हा शासनाचा दुजाभाव आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारने ई-पास सक्ती रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा  च्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER