Google सर्चचे ‘हे’ फिचर ‘फेक न्यूज’ ओळखण्यास करेल मदत!

Googel Search New Feature - Maharashtra Today

‘फेक न्यूज’ सोशल माध्यमांवर वेगाने पसरत आहेत. याचा शोध घेण्यासाठी मोठमोठ्या तंत्रज्ञान कंपन्या सतत काम करत असतात. Twitter ‘फेक न्यूज’च्या खाली ‘मैनिपुलेटेड मीडिया’चा लेबल लावत असतात. अशाच काही प्रकारचे लेबल Facebook सुद्धा लावत आहे. बनावट बातम्यांचा सामना करण्यासाठी ही साधने पुरेसे नाहीत. म्हणून Google कडून ‘फेक न्यूज’चा बचाव करण्यासाठी एक नवे टूल तयार करण्यात येणार आहे.

Googleच्या नवीन टूलमध्ये युजर्संना ‘फेक न्यूज’संदर्भात सांगितले जाईल. Google I/O २०२१ मध्ये या फिचरबद्दल सांगण्यात आले होते. गुगलने या फीचरचे नाव ‘About this Result’ असे ठेवले आहे. याला सर्च करताना बघितले जाऊ शकते. कोणतीही साईट स्वतःला कसे तयार करतात, ते या फीचर्सचे यूजर्स पाहू शकतात. यासाठी विकिपीडिया पृष्ठाचाही लिंक दिला जाईल. यावर कंपनी विकिपीडियासोबत काम करत आहे. यामध्ये दिलेली माहिती ‘अप टू डेट वेरिफाइड’ असणार आहे.

Googleने ब्लॉगमध्ये सांगितले की, यापूर्वी आपण साइटचे नाव कधीच ऐकले नसेल तर अतिरिक्त माहितीसाठी अधिक उपयुक्त ठरेल. विशेषत: आपण आरोग्य आणि आर्थिक संबंधित माहिती शोधत असाल तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जर विकिपीडियावर कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यास, Google आपल्याला दुसरी कोणतीही उपलब्ध माहिती दर्शवेल. उदाहरणार्थ, गुगलने प्रथम साइट कधी अनुक्रमणिका केली. त्यावेळी गूगल वापरकर्ते साइटचे कनेक्शन सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यास सक्षम राहतील.

Google साईटवर https प्रोटोकॉल दिसेल. हा प्रोटोकॉल वेबसाइट आणि ब्राउझरचा डेटा encrypts करतो. हे वेब ब्राउझ करताना त्यांना सुरक्षित राहण्यास मदत करते. या फीचरला फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत आणण्यात आले. आता या महिन्याअखेरीस हे फीचर्स सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहचेल. हे फिचर आधी मोबाइल आणि डेस्कटॉपसाठी उपलब्ध होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button