‘हा’ पराक्रम फक्त मुंबईच्याच गोलंदाजांचा!

MI - Maharashtra Today

मुंबईच्या (MI) फलंदाजांनी शनिवारी दिल्लीतील जेटली स्टेडियमवर चेन्नईच्या (CSK). गोलंदाजांची जबर धुलाई केली. लुंगी एन्जीडीच्या (Lungi Ngidi) चार षटकांत ६२ आणि शार्दूल ठाकूरच्या चार षटकांत ५६ धावा निघाल्या. या प्रकारे आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एकाच संघाच्या दोन गोलंदाजांच्या गोलंदाजीवर ५० पेक्षा अधिक धावा निघाल्या. शिवाय एन्जीडी हा ६० पेक्षा अधिक धावा देणारा चेन्नईचा पहिलाच गोलंदाज ठरला.

त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात आता मुंबई इंडियन्स हा एकमेव असा संघ ठरलाय ज्याच्या गोलंदाजांनी कधीच ६० वर धावा दिलेल्या नाहीत. आतापर्यंत मुंबईचा सर्वांत महागडा ठरलेला गोलंदाज आहे लसिथ मलिंगा (Lasith Malinga) ज्याने एकदा ५८ धावा दिल्या होत्या; पण मुंबईच्या कोणत्याही गोलंदाजाने ६० किंवा अधिक धावा दिलेल्या नाहीत.

प्रत्येक आयपीएल संघासाठी सर्वांत महागडी गोलंदाजी

  • ०/७०- बासील थाम्पी (हैदराबाद)
  • ०/६६- मुजीब उर रहमान (पंजाब)
  • ०/६५- उमेश यादव (दिल्ली)
  • ०/६२- लुंगी एन्जीडी (चेन्नई)
  • ०/६१- टीम साउथी, शेन,वाॕटसन (बंगलोर)
  • ०/६०- अंकित राजपूत (राजस्थान)
  • २/६०- रायन मॕक्लारेन (कोलकाता)
  • ०/५८- लसिथ मलिंगा (मुंबई)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button