“या” माजी क्रिकेटपटूने CSK ला पैसे वाचविण्याचा दिला सल्ला, म्हणाला- ‘धोनीला संघातून मुक्त करा’

Akash Chopra - MS Dhoni

आकाश चोपणेने चेन्नई सुपर किंग्जला (CSK) धोनीला १५ कोटीत राखून न ठेवण्याचा सल्ला दिला आणि म्हणाला, राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून धोनीला संघात परत आणा.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कमेंटेटर आकाश चोप्राने (Akash Chopra) एमएस धोनी (MS Dhoni) बद्दल मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की २०२१ मध्ये IPL साठी मोठी लिलाव होत असेल तर चेन्नई सुपर किंग्जने आपला कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोडले पाहिजे. चोप्राच्या मते, तीन वेळा चॅम्पियन चेन्नईने धोनीला कायम ठेवले तर संघाला धोनीसाठी १५ कोटी रुपये द्यावे लागतील.

आकाश चोप्राने आपल्या फेसबुक पेजवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘मला वाटते की मोठा लिलाव झाल्यास चेन्नईने धोनीला सोडले पाहिजे. मी असे नाही म्हणत कि तुम्ही धोनीला संघात ठेवू नका. तो पुढचा IPL खेळेल आणि जर तुम्ही त्याला टिकवून ठेवले तर तुम्हाला १५ कोटी द्यावे लागतील.’

तो म्हणाला, ‘जर धोनी कायम राहिला आणि त्याने फक्त २०२१ आयपीएल खेळला तर २०२२ च्या हंगामात तुम्ही १५ कोटी परत मिळतील, पण मग तुम्ही त्या पैशाचे काय कराल? मोठ्या लिलावाचा हा फायदा आहे. चेन्नई राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून धोनीला संघात परत आणू शकतात.’

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीने IPL -१३ च्या अंतिम सामन्याआधी हे स्पष्ट केले होते की तो या क्षणी IPL मधून निवृत्त होणार नाही आणि पुढच्या वर्षीही या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.

IPL -१३ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक दरम्यान, जेव्हा भाष्यकार डॅनी मॉरिसनने विचारले की चेन्नईसाठी तुमचा IPLचा हा शेवटचा सामना आहे काय? तर धोनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, “नाही, पूर्णपणे नाही”.

धोनीपूर्वी CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनीही यावर्षी ऑगस्टमध्ये सांगितले होते की, धोनी २०२१ आणि २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून IPL मध्ये खेळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER