
मुंबई : विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) व शिवसेनेसह (Shiv Sena) सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.
या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेवून भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली, असा टोलादेखील रोहित पवार यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. भाजपाचे वर्चस्व असलेल्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आता तरी भाजपानं खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नसल्याचं ते म्हणाले.
भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी #मविआ साठी निष्ठेची होती.राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.या निवडणुकीत जनतेने #मविआ ची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला