हा शिक्षणाधिकारी नालायक व बेशरम : जिल्हा परिषदेच्या सभेत विरोधी पक्ष नेत्याचा संताप

ZP Meeting

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील हे नालायक व बेशरम असल्याचे बादग्रस्त विधान जिल्हा परिषदेच्या सभेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केल्यानंतर ते म्हणाले मला माफ करा परंतू मी जेकाही वक्तव्य करत आहे त्यामागील संताप समजून घ्या.

अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज सुरु झाली. सभेत जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देण्यासाठी शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील सभागृहात उभे झाले असता विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी त्यांना थांबवत याला आधी खाली बसवा…. हा शिक्षणाधिकारी नालायक व बेशरम आहे… याला येथे काम करायचे नाही. वारंवार रजा काढून निघून जाते त्यामुळे अनेक शाळा, शिक्षक व कर्मचा-यांची कामे खोळंबली असल्याचे ते म्हणाले.

सभागृहात सुर्यकांत पाटलांना बोलण्याचा अधिकार नाही व आम्ही त्यांना बोलू देणार नाही अशी भूमिका घेतली़ साठे यांच्या या रूद्रावताराने सभागृह अवाक् झाले आणि माध्यामिक शिक्षणाधिकारी काही न बोलता खाली बसले.