ग्रामीण भागासाठी ‘हा’ निर्णय ठरणार गेमचेंजर – अजित पवार

Ajit Pawar

बारामती :- ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम (Chief Minister Employment Generation Programme) हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून यात पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरपूर तरतूद करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

या योजनेतून मोठ्या संख्येत उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल. पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट प्राप्त केले तर मोठ्या प्रमाणात युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय, फिरते विक्री केंद्र या व्यवसायांमध्ये युवकांना व युवतींना संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : काम चांगले केले नसेल तर ठेकेदारांना खपवतो, अजित पवारांनी दिला दम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER