ही गर्दी पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवे याचा प्रत्यय देणारी – अमित शहा

Amit Shah

बोलपूर : पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या ‘रोड शो’ला तुफान गर्दी झाली. “माझ्या आयुष्यात मी आजवर असा ‘रोड शो’ अनुभवला नाही”, असे अमित शहा म्हणाले.

vविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा प.बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बोलपुर चौक ते डाक बंगलापर्यंत अमित शहा यांच्या ‘रोड शो’चं आयोजन करण्यात आले आहे. कोविडचे संकट असतानाही शहा यांच्या या ‘रोड शो’ला तुफान गर्दी आहे. अमित शहा यांनी भाजपा नेत्यांच्या बैठकीपासून ते निवडणुकीसाठीची रणनिती आणि प्रचार केला.

रोड शोची गर्दी पाहून अमित शहा म्हणालेत, आजवर मी अनेक रोड शो केले पण असा रोड शो आयुष्यात पाहिला नाही. ही गर्दी पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवे याचा प्रत्यय देणारी आहे. भाजपाला विजयी करायचे हे जनतेने मनात पक्क केले आहे. ममता ब्रनर्जींच्या सरकारविरोधात लोकांच्या मनात प्रचंड राग दिसतो आहे.

प. बंगालच्या बीरभूममधील बोलपूर येथून अमित शहा यांच्या ‘रोड शो’ला सुरुवात झाली आहे. बोलपूर ते हनुमान मंदिर आणि पुढे डाक बंगला असा रोड शोचा मार्ग आहे. हे अंतर फक्त २ कि. मी. आहे. पण भाजपा समर्थकांच्या तुफान गर्दीमुळे शहा यांचा ताफा अत्यंत धीम्यागतीने पुढे सरकतो आहे. अमित शहा यांच्यासोबत कैलास विजयवर्गीय, दिलीप घोष आणि इतर भाजपायाचे इतर नेते उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER