आवश्यकता म्हणून हे नायक झाले न्यूड

बॉलिवूडमध्ये (Bollywood) नायिकांचे अंगप्रदर्शन म्हणजे प्रेक्षकांना मेजवानी असते आणि त्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमे पाहायला येतात असा निर्माता-दिग्दर्शकांचा समज आहे आणि त्यामुळेच निर्माते-दिग्दर्शक कथेत नायिकांना अंग दाखवण्यास भाग पडेल असे सीन लिहितात. सलमान खान (Salman Khan), ऋतिक (Hrithik Roshan), टायगर (Tiger Shorf) त्यांच्या शरीरसौष्ठवामुळे ओळखले जातात. त्यामुळेच यांनाही पडद्यावर शर्ट काढायला लावून त्यांच्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडवले जाते. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही नायक आहेत जे कथेची मागणी असल्याने अंगावरचे सर्व कपडे काढून न्यूड सीन देण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. हॉलिवूडमध्ये नायक-नायिका सर्रास न्यूड दाखवतात पण आपल्याकडे तसे होत नाही. त्यामुळेच नायकाने न्यूड सीन द्यायचे म्हटले की चर्चा सुरु होते.

लवकरच ‘मॅन नेकेड’ नावाचा एक सिनेमा येत असून यात प्रख्यात निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा आणि अभिनेत्रा आलिया भट्टचा भाऊ राहुल भटने न्यूड सीन दिला आहे. दोन तासांचा हा सिनेमा असून केवळ एका शॉटमध्ये हा सिनेमा पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन संजीव कौलने केले आहे. हा सिनेमा एका 40 वर्षीय रॉनी नावाच्या अभिनेत्याची कथा सांगणारा आहे. आपले करिअर संपले असे त्याला वाटत असते आणि त्यामुळेच तो सतत दारुच्या नशेत घरात न्यूडपणेच वावरत असतो. एक दिवस रात्री त्याच्या घराची बेल वाजते आणि जेव्हा तो दरवाजा उघडतो त्यानंतर त्याचे जीवनच बदलून जाते. त्याचे न्यूड व्हीडियो व्हायरल होतात आणि तो स्टार होतो. सिनेमाचे कथानक तसे असल्याने राहुलने सिनेमात न्यूड सीन केले. राहुलने यापूर्वी ‘आर्टिकल 375’ मध्येही न्यूड सीन दिला आहे.

केवळ राहुल भट्टनेच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांनी कथेची आवश्यकता म्हणून न्यूड सीन दिलेले आहेत. आमिर खानला बॉलिवू़डमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. आपल्या भूमिकेसाठी तो गेटअपपासून शरीर पिळदार करण्यापर्यंत मेहनत घेतो. आपली भूमिका खरी वाटावी याकडे तो पूर्ण लक्ष देत असतो. त्यामुळेच ‘पीके’ सिनेमासाठी जेव्हा दिग्दर्शक राजकुमार हिरानीने त्याला न्यूड शॉट देण्यास सांगितले, तेव्हा कथेची डिमांड पाहून त्याने लगेच होकार दिला होता. पूर्णपणे न्यूड असलेला आमिर रेल्वे ट्रॅकवर उभा असतो आणि त्याने हातात फक्त एक ट्रांझिस्टर घेतलेला दाखवलेला होता. त्याचा हा शॉट पोस्टरवरही टाकण्यात आला होता आणि त्याचीही खूप चर्चा झाली होती.

करण जोहरच्या ‘दोस्ताना’त पिळदार शरीरयष्टीच्या जॉनने शर्टलेस शॉट दिला होता त्याची चर्चा झाली होती. जॉनने कबीर खान दिग्दर्शित ‘न्यूयॉर्क’ सिनेमात पूर्णपणे न्यूड शॉट दिला होता. या सिनेमात जॉन अब्राहमला पोलीस पकडतात आणि त्याला टॉर्चर करतात असा ही सीन होता. जॉनचा हा सीन खूपच चर्चेत आला होता.

रणबीर कपूरने तर पहिल्याच सिनेमापासून न्यूड शॉट देण्यास सुरुवात केली होती. संजय लीला भंसाळीने रणबीर कपूरला ‘सांवरिया’तून रुपेरी पडद्यावर आणले होते. या सिनेमात रणबीरने न्यूड शॉट दिला होता आणि त्याची खूप चर्चाही झाली होती. त्यानंतर रणबीरने पुन्हा एकदा तीन वर्षांपूर्वी संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’मध्येही न्यूड शॉट दिला होता.

नील नीतिन मुकेशनेही मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘जेल’मध्येही न्यूड शॉट दिला होता तर राजकुमार रावने शहीद सिनेमात, कुणाल कपूरने रंग दे बसंती सिनेमात न्यूड शॉट दिलेले आहेत.

नायिका ज्याप्रमाणे न्यूड फोटोशूट करतात त्याप्रमाणे काही नायकांनाही न्यूड फोटोशूट करून खळबळ माजवली होती. याची सुरुवात मिलिंद सोमणने केली होती. एका जाहिरातीसाठी मिलिंद सोमण पूर्ण न्यूड झाला होता. या जाहिरातीमुळे त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हाच मिलिंद सोमण काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त बीचवर न्यूड होऊन धावला होता. त्याचे हे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते आणि यावरूनही त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आदित्य पंचोलीनेही एका मॅगझिनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोसेशन केले होते. रणवीर सिंह त्याच्या चित्र विचित्र फॅशनसाठी ओळखला जातो. त्यानेही न्यूड फोटो सेशन केले होते. यात तो एका पाण्याच्या टबमध्ये पूर्णपणे न्यूड होऊन एखाद्या मुलाप्रमाणे झोपलेला दिसत होता. त्याचे हे फोटोसेशन खूपच खळबळ माजवणारे ठरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER