…अन थेट जनता दरबारात गरीब कोरोना रुग्णांसाठी पवारांनी केली ही घोषणा

Sharad Pawar & rajesh Tope

मुंबई : सध्या राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढतच चालली आहे. आतापर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाखांवर गेली आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी १ हजार रेमडेसिवीर (Remedesivir) इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपेंची (Rajesh Tope) भेट घेऊन शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे.

आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. यावेळी अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्यानं १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केल्याचं पवार यांनी टोपेंना सांगितलं. सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचना यावेळी शरद पवार यांनी राजेश टोपे यांना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER