
स्टॉक्स अँड पॅरिश (Stokes and Parish) कंपनीचा वारस, अमेरिकेतल्या मोठ्या उद्योजकाचा मुलगा सॅम्यूअल स्टॉक्स ज्यूनिअरनं (Samuel Stokes Jr.) भारतात कोड रोगाने पिडीत व्यक्तींची सेवा करण्यात आयुष्य घालवंल. ते फक्त भारतात राहिले नाहीत तर इंग्रजांना भारतातून हकलून देण्यासाठी स्वातंत्र युद्धात त्यांनी भाग घेतला. ही गोष्ट आहे सत्यानंद बनलेल्या स्टॉक्स यांची जे गरिबांचे वाली आणि भारतीय स्वातंत्र्याचे सैनानी होते.
वर्ष १९०४ अमेरिकेतली ऐशोआरामाची जिंदगी सोडून सॅम्यूअल्स भारतात आले. त्यांच्या वडीलांना वाटलं की त्यांचा मुलगा पर्यटनासाठी काही काळासाठी भारतात जातोय. पण त्यांना माहिती नव्हतं की मुलाची ही ट्रीप त्याला भारतीय बनवेल.
सॅम्यूअल्स भारतात आले आणि हिमालयाने त्यांना दत्तक घेतलं. शिमला जवळ कोड पिडीत रुग्णांची त्यांनी सेवा सुरु केली. जेव्हा ते हे काम करत तेव्हा त्यांना जाणवायला लागलं की भारतीय लोक त्यांना परकीय समजतात. भारतीयांना सॅम्यूअल्स आपल्यातले वाटावेत म्हणून त्यांनी भारतीयांसारखं वागायला सुरुवात केली. पहाडी बोली शिकले. आणि त्यांची ही युक्ती कामाची निघाली.
वर्ष १९१२मध्ये राजपूत – ख्रिश्चन मुलगी बेंजामिना एगनिह्सवर त्यांचा जीव जडला. त्यांनी लग्न केलं. १९१६ला अमेरिकेत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या सफरंचंदाच्या एका प्रजातीबद्दल त्यांना कळालं जी हिमायलयात उगवू शकते. त्यांनी हिमालयाच्या कुशीतल्या शेतकऱ्यांना सफरचंदाची शेती करण्यासाठी तयार केलं. ज्यामुळं रोजगार मिळून त्यांची आर्थिक स्थितीची सुधारणा होईल.
फक्त इतकच नाही तर त्यांच्या संपर्काचा उपयोग करुन त्यांनी दिल्ली बाजाराचे रस्ते ही सफरचंदाच्या विक्रीसाठी सुरु केले. आज भारतात केल्या जाणाऱ्या सफरचंदाचे सॅम्यूअल्स प्रणेते आहेत.
आणखी एक गोष्ट आहे ज्यासाठी त्यांचा आठवण काढली जाते.
भारताचा (India) स्वातंत्र्य लढा
भारतीयांवर इंग्रज करत असेल्या जुलमाचा आणि शोषणाचा सॅम्यूअल्स सुरुवातीपासूनच विरोध करत होते. त्यांची लढाई शोषणाविरुद्ध होती. महायुद्धाच्या काळात भारतीय युवकांना जबरदस्ती इंग्रज सैन्यात भरती केलं जात होतं याचा त्यांनी कडाडून विरोध केला होता. अनेकदा इंग्रज अधिकाऱ्यांना नोटीसी पाठवून त्यांनी या प्रकाराचा विरोध केला. हिमालयातील पहाडी लोकांचा सन्मान जोपासण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. वेळप्रसंगी ब्रिटीशांशी थेट टक्कर घेतली.
यातली महत्त्वाची गोष्ट अशी की. इंग्रजांना हिमालयाच्या पहाडी भागातील लोकांविषयी, शेतकऱ्यांविषयी जेव्हाही ते पत्र लिहायचे तेव्हा ते शेतकऱ्यांचा उल्लेख ‘ते’ न करता ‘आम्ही’ असा करायचे. यावरुन समजत की त्यांनी भारताला किती स्वीकारलं होतं.
एप्रिल १९१६ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं. पंजाबच्या जलियनवाला बागमध्ये जमलेल्या शेकडो निष्पाप जनतेवर जनरल डायरनं गोळीबार केला. भारतीय लोकांप्रती इंग्रजी सरकारची जाचक धोरणं बघून त्यांनी थेट स्वातंत्र्यता संग्रामात उडी घेतली.
ते मैदानात उतरून खुल्या तऱ्हेने इंग्रजांच्या विरोधी आंदोलनात सहभाग घेवू लागले. त्यांना पंजाब प्रांतीय कॉग्रेसचे ते सदस्य होते. १९२०च्या नागपूरच्या कॉंग्रेसमध्ये सहभाग नोंदवणारे एकमेव बिगर भारतीय व्यक्ती होते.
१९२१ला प्रिंस वेल्सच्या भारत दौऱ्याचा त्यांनी विरोध केला. यासाठी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ते सहा महिने तुरुंगातही राहिले.
त्यांना सात मुलं होती. त्यातल्या एकाचा बालपणी मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. सॅम्यूअल स्टॉक्स सत्यानंद बनले. त्यांच्या पत्नीनेही त्यांच अनूकरण करत हिंदू धर्म स्वीकारला त्यांचं नाव प्रियदेवी झालं.
त्यांच्या मुलांना त्यांनी भारतीयाप्रमाणं सांभाळलं. मुलांची लग्न सुद्धा भारतीयांशी केली. त्यांना भारतात रहायचं होतं आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलांनी देखील भारतीयासारख रहावं, वागावं. या परिवर्तनानंतर दहा वर्षांनी १४ मे १९४६ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शिमल्याच्या कोटघर इथे त्यांना दफन करण्यात आलं.
भारतासाठी सत्यानंद यांनी केलेल्या नव्या सुधारणा, रुजवलेली सफरचंद शेती आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यामुळं त्यांच भारतीय इतिहासात वेगळं स्थान आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला