इंधन दरवाढीसंदर्भात मोदींना दिला ‘हा’ सल्ला!

Rohit Pawar-PM Modi

मुंबई : सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. हे आटोक्यात आणावे, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबत सल्ला दिला आहे.

ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, ‘एक्साइस ड्युटी’ कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण राज्यांना एक्साइजमध्ये वाटा असतो. मात्र, सेसमध्ये राज्यांचा वाटा नाही. त्यामुळे एक्साईजऐवजी सेस कमी करण्याबद्दल विचार करण्याची गरज आहे, अशी विनंती रोहित पवार यांनी सरकारला केली आहे.

सध्या संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. समाजमाध्यमात तर अनेक व्हिडिओज आणि फोटोज् व्हायरल होत आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या या सूचक ट्विटमुळे मोदी सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोले आणि काँग्रेस नेत्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. रोज वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहेत. पण, घरगुती गॅसच्या किंमती सध्या भडकल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे. आता सरकार काय पाऊल उचलणार, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER