
१९४०-५० च्या दशकात या अभिनेत्रीचे वर्चस्व होते. प्रत्येक जण या अभिनेत्रीच्या शैली आणि सौंदर्यासाठी वेडा होता. आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत जिने मधुबालाच्या सौंदर्याशी स्पर्धाही केली, तिचे नाव नलिनी जयवंत (Nalini Jaywant) आहे. नलिनीने बालकलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले; पण तिने चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकासुद्धा निभावली. तथापि, या अभिनेत्रीला तिच्या शेवटच्या क्षणी तिच्या कुटुंबातील सदस्यांनी साथ नाही दिली किंवा तिच्याबरोबर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांनी. नलिनीने त्या दशकात बॉलिवूडवर राज्य केले होते. आज नलिनीची पुण्यतिथी आहे. २०१० मध्ये, नलिनीने या जगाला शेवटचे सलाम म्हटले होते.
एक काळ असा होता की, नलिनी यशाच्या शिखरावर होती; पण शेवटच्या क्षणी तिला विस्मृतीचे जीवन जगावे लागले. नलिनी जयवंत मरण पावली तेव्हा कुणालाही याची माहिती मिळाली नाही. तिचा मृतदेह तीन दिवसांपासून खोलीत पडून होता. तिच्या घरच्यांनीही तिला सोडून दिले होते. डिसेंबर २०१० मध्ये, जेव्हा नलिनीचा रहस्यमय मृत्यू झाला, अशी चर्चा सुरू झाली. असे म्हणतात की, अज्ञात व्यक्तीने येऊन रुग्णवाहिकेत नलिनीचा मृतदेह ताब्यात घेतला, पोलिसांत या प्रकरणाची कोणतीही तक्रार नव्हती. नलिनीचे दोन विवाह झाले होते. पहिले लग्न ४० च्या दशकातले दिग्दर्शक वीरेंद्र देसाई आणि दुसरे लग्न अभिनेता प्रभु दयालशी झाले होते.
नलिनीने नास्तिक, बंदिश, काला पानी, किशोरी, मिस्टर एक्स. यासारख्या चित्रपटांत भूमिका केली होती. तिने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात केली. १९४१ मध्ये ‘राधिका’ या चित्रपटात काम केले होते. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात, ती ‘समाधी’ आणि ‘संग्राम’ यासारख्या चित्रपटांमुळे पहिल्या दर्जाची स्टार होती. अशोककुमार-नलिनीच्या जोडीला चांगलीच पसंती मिळाली. त्यावेळी नलिनी हिने हिंदी चित्रपटसृष्टीतील शीर्ष अभिनेत्री मधुबालाला सौंदर्यातही टक्कर दिली. १९५२ मध्ये फिल्मफेअर मासिकाने (Magzine) नलिनी जयवंत हिला पहिल्या स्थानावर आणले.
ते १९६० चे दशक होते, जेव्हा नलिनीला चित्रपट मिळणे बंद झाले. त्यानंतर नलिनी निवृत्त झाली आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली. यानंतर १९८३ मध्ये ‘नास्तिक’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका केली होती. नलिनीने कदाचित फिल्मी जगात आकाशाला स्पर्श केला असेल; परंतु वास्तविक जीवनात ती बरीच एकटी राहिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला