
मुंबई :- विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण (Satish Chavan) विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी (Abhijit Wanjarri) विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड (Arun Lad) यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या या अनपेक्षित यशानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही आभार मानले आहेत.
ही बातमी पण वाचा : … ते मुख्यमंत्र्यांचे कौतुक की अब्रु काढणं हे अजित पवारच सांगू शकतात ; भाजपा नेत्याचा टोला
या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील (Jayant Patil) जी,काँग्रेसचे नेते मा. बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नांतून हा विजय साकारला आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला.आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार.हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. या विजयाचा आम्हा सर्वांना आनंद आहे. यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही आभार मानले आहेत.
या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील जी,काँग्रेसचे नेते मा. बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नांतून हा विजय साकारला आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) December 4, 2020
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला.आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार.हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) December 4, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला