
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरात रविवारी जवळपास ३० पैशांची वाढ नोंदवण्यात आली. नवीन दरांनुसार राजधानीत पेट्रोल ०.२९ पैशांनी वाढून ८८.७३ रूपये लिटर पर्यंत पोहचला आहे. तर, डिझेलचे दर ०.३२ पैशांनी वधारल्याने ७९.०६ रूपयांपर्यंत पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलियमचे दर लागोपाठ वाढत आहे.
गेल्या वर्षी ते २० जानेवारीदरम्यान मुंबईत पेट्रोलचे दर
८१.०४ रूपये, कोलकाता ७८.०४ तसेच दिल्लीत ७५.४५ रुपये होते. तर, फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई, कोलकाता तसेच दिल्लीत पेट्रोलचे दर लिटरमागे अनुक्रमे ९५.२१, ९०.०१ तसेच ८८.७३ रूपयांपर्यंत पोहचले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सलग पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.
मध्य प्रदेशात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे.राज्याची राजधानी भोपाळमध्ये पॉवरचे पेट्रोल १०० रूपये ४ पैसे दराने विक्री केले जात आहे. सामान्य पेट्रोलचे दर लीटरमागे ९६ रूपये तर, डिझेलची किंमत ८६ रूपये ८४ पैसे झाली आहे. संसदेत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पंरतु, केंद्र सरकार यासंदर्भात काही एक करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुड ऑईलच्या किंमतीवरून पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे दर ठरवतात. केंद्रासह राज्य सरकार त्यांच्या आवश्यकतेनूसार विकासासाठी कर वाढवतात, असे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला