‘तिसरी लाट कोरोनाची नसेल तर मराठ्यांची असेल’, नितेश राणेंचा ‘ठाकरे’ सरकारला इशारा

Maharashtra Today

मुंबई :- बुधवारी सुप्रीम कोर्टाने (SC) मराठा समाजासाठी  (Marathi Resrvation)लागू केलेला आरक्षणाचा कायदा रद्द केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Govt.) कमी पडले, असा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) केला आहे. तर दुसरीकडे आरक्षण देण्याचा सर्वस्वी अधिकार राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला असल्याचे मत कोर्टाने नोंदवले असून, आता राष्ट्रपतींनी आणि केंद्राने आरक्षणाचा तिढा सोडवावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून होत आहे.

या सर्व घडामोडीत मात्र मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कालपासून राज्यातील अनेक ठिकाणी समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. तर काही अज्ञात लोकांनी सातारा (Satara) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय फोडले. मराठा समाजाकडून घेण्यात आलेली आक्रमक भूमिका बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. आणि अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करत थेट सरकारलाच इशारा देऊन टाकला. ‘एक मराठा लाख मराठा’ असं कॅप्शन देत ‘आता तिसरी लाट कोरोनाची नसेल तर मराठ्यांची असेल’ असा गर्भित इशारा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER