शिवसेनेचा भाजपला सर्वात मोठा धक्का; ११ नगरसेवक शिवबंधनात अडकणार, नाशिकची सत्ता जाणार?

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

नाशिक :- नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपला (BJP) एकापाठोपाठ आता तिसरा धक्का बसला आहे वसंत गीते (Vasant Gite), सुनिल बागुल (Sunil Bagul) यांच्या पाठोपाठ भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील (Dinkar Patil) सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिनकर पाटील हे आपल्या 11 समर्थक नगरसेवकांसह सेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्तेत असलेले भाजप अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. आज सकाळी शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची त्यांनी नाशिक येथे भेट घेतली असून, त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपने फोडोफाडी करून शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांना आपल्या पक्षात आणले. त्यामुळे बिथरलेल्या शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपचे माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांच्यापाठोपाठ आता दिनकर पाटीलही सेनेच्या तंबूत दाखल होणार आहे. दिनकर पाटील यांनी भाजपच्या 4 नगरसेवकांसह प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे.

दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिनकर पाटील यांचा सेनेत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. एवढंच नाहीतर भाजपचे 11 विद्यमान नगरसेवक सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सभागृहात, सत्ताधारी भाजप अल्पमतात जाण्याचे संकेत मिळत आहे. हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

त्याआधी माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल यांनी गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली. त्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER