‘याला धमकी समजा किंवा सल्ला’; मनसेचा कंगणा रनौतला इशारा

Kangana Ranaut - MNS

मुंबई : मुंबईत (Mumbai) पीओकेसारखे वातावरण निर्माण होत असल्याची भावना येत आहे, अशा आशयाचे ट्विट अभिनेत्री कंगणा रनौतने (Kangana Ranaut) केले होते. यावरून उद्भवलेल्या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसे (MNS) चित्रपट सेनेने नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी ट्विट करत कंगनाला धमकीवजा इशारा दिला आहे.

माझ्या मुंबई पोलिसांबद्दल (Mumbai Police) ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो… कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलिस. ज्या पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय, कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला… पण माझ्या मुंबई पोलिसांबाबत कोणीही काहीही बरळल तर मीच काय कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही. असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे, क्षणिक प्रसिद्धी व राजकारणासाठी तुम्ही बेताल बोलू शकता, मात्र मुंबई शहराची बदनामी सहन केली जाणार नाही, मुंबई हे शहर फक्त भारतातच नव्हे तर जगातील एकमेव सुरक्षित शहर आहे. तुम्ही या शहरात रात्री ३ वाजता ही बिनधास्त मनात बलात्कार किंवा खुनाची भीती न बाळगता घराबाहेर फिरू शकता. कारण हे पाकिस्तान नाही, असा टोला मनसेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी कंगनाला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER