लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागल्या वस्तू!

Things that start to stick - Maharashtra Today

नाशिक :- कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona Vaccine) दुसरा डोस घेतल्यानंतर सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या आहेत. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (Arvind Jagannath Sonar000000) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून  वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत.

अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशिल्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री बघितले. हे पाहून त्यांने आई-वडिलांची चाचणी घेतली. आईच्या बाबतीत वेगळे काही घडले नाही; पण वडिलांच्या अंगाला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी त्यांच्या परिचित खासगी डॉक्टरला दाखवले. त्यांनीदेखील हा अजब प्रकार असल्याचे सांगितले.

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी यांनीदेखील याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र अंधश्रद्धा  निर्मूलन  समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी भेट दिली. त्यांनी हा चमत्कार नसून विज्ञानाचाच एक भाग असून संबंधित ज्येष्ठ नागरिकाची वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button