बाळाचे नामकरण करतांना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

bars

विलियम शेक्सपियर म्हणतात की , “नावात काय ठेवले आहे ?” पण वास्तविक पाहता नावच व्यक्तीला ओळख देत असते. आपल्या बाळाच्या नामकरणासाठी त्याचे पालक बरीच तयारी करतात. हल्ली बाळाचे नाव काय ठेवायचे आहे हेसुद्धा बाळ गर्भात असतांना ठरविल्या जाते. खरं तर बाळाचं नामकरण करणे हे वाटतं तितकं सोपं काम नाही; कारण हेच नाव त्याला आयुष्यभर चिकटणार असतं. त्यामुळे बाळाचे नामकरण करतांना काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

नामकरण करतांना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या हे आपण जाणून घेऊया.

Namkaran१) बाळाचे नाव शोधतांना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या ती म्हणजे की, त्याचे किंवा तिचे नाव मित्रमैत्रिनींमध्ये थट्टेचे कारण बनू नये. बऱ्याचदा चिकू, डब्बू यासारखे नाव ठेवल्याने भविष्यात त्यांची खिल्ली उडविली जाऊ शकते.

२) दुसरी बाब अशी आहे की, ठेवण्यात येत असलेले नाव शक्यतो उच्चारण्यास सोपे असावे. यामुळे ते सर्वांच्या लक्षात राहील.

३) बाळाचे नाव हे शक्यतो प्रसिद्ध चित्रपट अभिनेता/अभिनेत्री, नद्या किवा प्रसिद्ध जागेच्या नावावरून ठेवू नये. यामुळे व्यावहारिक जगात त्यांना समस्या येऊ शकतात.

४) ठेवण्यात येणारे नाव हे सकारात्मक आणि अर्थपूर्ण असावे. अर्थहीन आणि नकारात्मक नाव ठेऊ नये.

५) जुन्या काळात विचित्र असे हिरालाल, बाबुराव, अनारकली अश्या प्रकारचे नाव ठेवण्यात येत होते; परंतु आता जग बदलले आहे. तसेच काहीजण आपल्या पूर्वजांच्या नावावरूनही नामकरण करतात. जसे पूर्वजांचे नाव जर राघवेंद्र राठोड असेल तर ते आदित्य राघवेंद्र असे ठेवतात. असे करणे टाळावे.