
जळगाव : कार्यकर्त्यांना थोपवून धरण्यासाठी आपलं सरकार येणार आहे, असं विरोधक सांगत राहतात, मात्र महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार आणि यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’च करत बसावे लागणार, असा टोमणा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मारला.
राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ सुरू आहे. या यात्रेच्या तयारीसाठीच्या बैठकीत खडसे बोलत होते. ते म्हणालेत, राज्याचे राजकारण बदलते आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आता पाय रोवते आहे. हे सरकार पडणार आहे, हे सरकार जाणार आहे, असे विरोधकांना कितीही वाटत असले तरी हे सरकार टिकणार आहे, चालणार आहे.
फडणवीसांवर टीका
नाव न घेता फडणवीसांवर टीका करताना खडे म्हणालेत, कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये, म्हणून काही गोष्ट कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना थांबवून ठेवण्यासाठी, ‘अरे बाबा सरकार येणार आहे जाऊ नकोस, तुला महामंडळ देणार आहे, तुला समिती देणार आहे, हे सरकार पडणार आहे’, असे सांगावे लागते. एक वर्ष उलटले, अशीच पाच वर्ष निघून जातील आणि त्यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’च करत बसावं लागेल.
#राष्ट्रवादी_परिवार_संवाद यात्रेच्या तयारीनिमित्त आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यात सहभागी झालो आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. @NCPspeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks pic.twitter.com/ofTbRlHK9b
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 3, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला