ते जीन्स पँटचे चुकीचे झाले , पण…; अजित पवार यांचे सरकारी ड्रेसकोडवर भाष्य

Ajit Pawar

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स घालू नये, असे ड्रेस कोडसंदर्भातील नियम (Dress Code Rules) राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत. यापार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले . ते जीन्स पँटचे चुकीचे झालं, पण आम्ही त्याबद्दल अधिक विचार करत आहोत. टीशर्ट नाही, तरी किमान जीन्स घालण्याबाबत दिलासा मिळण्याची पुसटशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे, असे पवार म्हणाले .

महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहेत. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं आहे. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

यावरून सरकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण कपडे घालून यावे, ही सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कधीच मंत्रालयात टीशर्ट घालून येत नाहीत. घरी असताना टीशर्ट घातल्यास ठीक आहे. पण जीन्स पँटचे चुकीचे झाले. आम्ही त्याच्यावर विचार करत आहोत’ असे अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER