‘ते’ जातीय दंगली भडकवू इच्छितात; योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर आरोप

Yogi Adityanath

पाटणा : उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधक उत्तरप्रदेश सरकारला धारेवर धरत आहेत. मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तरीही टीका सुरूच आहे.

यावरून योगी यांनी विरोधकांवर आरोप केला – ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. याबाबतच्या ट्विटमध्ये योगी म्हणाले – ज्यांना विकास आवडत नाही ते लोक देशात व प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आड विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्रे रचली जात आहेत. मात्र आम्हाला  ही सर्व षडयंत्रे  ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधानंतर काल पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी त्या कुटुंबीयांची भेट घेतली. आझाद यांनी सरकारकडे काही मागण्याही केल्या आहेत. बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर उत्तरप्रदेशातील वातावरण तापले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER