उद्धव ठाकरेंचा रावण अवतार मीम्स शेअर करत कंगना म्हणते, मी धैर्याने पुढे जात राहीन…

त्यांनी मला घाबरवण्याचा प्रयत्न केला, मी धैर्याने पुढे जात राहीन, 'जय महाराष्ट्र' - कंगना

Uddhav thackeray 0& Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) नवीन ट्विट केले आहे. ती म्हणते, “लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.” कंगना, रिया हे विषय आमच्यासाठी संपले आहेत, अशी भूमिका शिवसेनेनं (Shivsena) घेतल्यानंतरही कंगना शिवसेना वादावरील मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अशाच एका मीम्सवर कंगना रणौतने ही प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेला मीम्स कंगानानं पोस्ट केला. या मीम्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे  राणी लक्ष्मीबाई यांना युद्धात उतरण्यापूर्वी मानाची तलवार देताना दिसत आहेत. या फोटोवरून कंगनानं नवा वाद छेडला आहे.

शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले असले तरी कंगना मागे हटायला तयार नाही. शिवसेनेवर टीका करतानाच तिने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही काही प्रश्न केले. ‘प्रिय आणि सन्मानीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तुम्ही एक महिला आहात. मग महाराष्ट्रातील तुमचे सरकार माझ्यासोबत करत असलेल्या वर्तणुकीचा तुम्हाला राग येत नाही का? तुमचे सरकार महिलेवर अन्याय करत आहे, कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत आहे.

तुम्ही आता बोलले पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप कराल.’ असे कंगनाने कॉंग्रेस हायकमांडकडे म्हटले होते. त्यानंतर आता कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट रावणाच्या अवतारात दाखवलेल्या  मीम्सवरून ट्विट  केले आहे. यावर शिवसेना काय उत्तर देते, की शांत बसून अजून कोणते पाऊल उचलते हे पाहण्यासारखे असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER