‘त्यांनी एकदा आरशात बघावे !’ सचिन वाझे प्रकरणावरून फडणवीसांचा संजय राऊतांना टोमणा

Sanjay Raut - Sachin Vaze - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘हा राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे’ अशी टीका नाव न घेता भाजपावर केली. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले – … मुंबई पोलिसांवर अविश्वास, महाराष्ट्रद्रोह वगैरे म्हणणाऱ्यांनी स्वत:ला आरशात पाहिले पाहिजे. एवढे भयानक कुणी वागत असेल? त्यातून मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळते का?

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्यात सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये (BJP) आरोपांचे राजकारण पेटले आहे. शिवसेनेचे संजय राऊत म्हणालेत – हा प्रकार म्हणजे केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे.

या आरोपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले – आज ज्यांना अटक झाली आहे, तेच या प्रकरणाचा तपास करत होते. ही बाब गंभीर आहे. आता एवढे पुरावे समोर आल्यावर मुंबई पोलिसांवर अविश्वास, महाराष्ट्रद्रोह वगैरे म्हणणाऱ्यांनी आधी स्वत: आरशात पाहिले पाहिजे. एवढे भयानक कुणी वागत असेल, त्यातून मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळते का, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. राज्य खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हा हास्यास्पद आणि दुधखुळेपणा आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून माझे काम आहे. अशा प्रकारची माहिती घेऊन मांडण्याचे. खरे तर याची गरज पडू नये. मात्र ती गरज का भासली याचे उत्तर संजय राऊत यांनी दिले पाहिजे. पोलीस कथित रूपाने ‘प्लॅन’ करतात. पोलिसांच्या अशा प्लॅनिंगमध्ये एका व्यक्तीची हत्या होते. या सगळ्या गोष्टी होत असतील आणि त्या दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटते संजय राऊत यांनी यंत्रणेला प्रश्न विचारला पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER