त्यांनी इतिहास जरा चाळून पहावा , भाजपावर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेसाठी (Shivsena) सावरकर सदैव हिंदुत्वाचे मार्गदर्शक राहिले आहेत. भारतीय जनता पार्टीने (BJP) इतिहास चाळून पहावा. सावरकरांवर टीका करण्याऱ्यांचा आम्ही विरोध केला आहे, या शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचबद्दलची शिवसेनेची आदराची भावना प्रकट केली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सावरकरानी या देशातल्या क्रांतिकारकांचे नेतृत्व केले आहे. वीर सावरकरांना ‘भारत रत्न’ द्या, अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. कालही केली. का देत नाही सावरकराना भारत रत्न ? असा प्रश्न राऊत यांनी केला. गेल्या पाच – सात वर्षात या सरकारने अनेकांना भारत रत्न दिले, सावरकरांना का नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER