‘त्यांना’ भरचौकात जोड्याने हाणले पाहिजे- व्ही. के. सिंग

VK Singh

नवी दिल्ली : १४ फेब्रुवारी २०१९ ला सुरक्षा बलाच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला हल्ला सरकारनेच घडवून आणला, असा आरोप देशातील काही विरोधी पक्षांनी केला होता. आता, हा हल्ला पाकिस्ताननेच केला होता अशी कबुली पाकिस्तानने दिली. यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटले आहे की, याबाबत सरकारवर टीका करणाऱ्यांना भरचौकात जोड्याने हाणले पाहिजे.

सिंग म्हणालेत, पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला आहे, अशा वल्गना करण्यात आल्या. याच पक्षाने भगवा दहशतवादाचा उल्लेख केला होता. अशा लोकांना उघड्यावर जोड्याने बडवले पाहिजे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तर या हल्ल्यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी सरकारने हा हल्ला घडवून आणला असे म्हटले होते. तसेच बालकोट हल्ल्याच्या पुराव्याची चौकशी करण्यासाठी आणि या हल्ल्याची माहिती मिळावी म्हणून एका संयुक्त राष्ट्र समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

दरम्यान, पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी संसदेत भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे कबूल केले आहे. पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इमरान खान यांच्या नेतृत्वातील सरकारचे यश असल्याचे चौधरींनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानला पंतप्रधान इमरान खान यांच्याबद्दल आदर असला पाहिजे; कारण आपल्या देशाने भारताच्या भागात घुसून त्यांच्यावर हल्ला केला आहे, असे फवाद चौधरी म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER