‘त्यांच्याकडे लक्ष देत नाही, आणि आम्ही सामनाही वाचत नाही’, काँग्रेसने राऊतांना सुनावले

Nana Patole - Saamana - Sanjay Raut

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये धुसफुस असल्यानं अनेकदा समोर येत आहे. विशेषत: काँग्रेसची (Congress) शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रती (NCP) असलेली प्रचंड नाराजी अनेकदा दिसून आली आहे. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रविवारी पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लक्ष करत सहभागी असलेल्या ‘ठाकरे’ सरकारला घरचा अहेर दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत.

मोदी सरकारला लढा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय स्तरावरही अशा आघाडीची गरज आहे. या विषयावर शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच त्यासाठी हालचाली सुरु होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत पटोले म्हणाले, संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना वाचणं आम्ही बंद केलं. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, याची माहिती कदाचित राऊत यांना नसावी, अशी खोचक टीका पटोले यांनी केली. .

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्तेत असूनही ‘ठाकरे’ सरकारला (Thackeray Government) घरचा अहेर दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय करता येईल यासाठी सध्या राज्य सरकार विविध बाजूने विचार करत आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गायकवाड आयोगानंतर आखणी एक नवीन आयोग बसवण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला सुनावले आहे. समाजाला माग ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. त्यामुळं नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, असं म्हणत पटोले यांनी सरकारलाच घरचा अहेर दिला.

भाजप यांच्या सरकार पाडण्याच्या वक्तव्यावरूनही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपा हे पोथी-पुराण वाले असून ते सरकार पाडण्यासाठी रोज नवनवीन तारखा शोधत आहेत. कायम कुणी तरी मरावे यासाठी ते तारखा काढतात. खरं तर भाजपला त्यांचे लोक पळून जातीलयाची जास्त चिंता आहे, त्यामुळं ते नवनवीन तारखा घोषित करतात, असं म्हणत मुनंगटीवार यांनी अनेकदा राष्ट्रपती राजवटीबाबत भाष्य केलं, पण काय झालं. महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं ते म्हणाले.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महामारी यासाठी अनेक सूचना केल्या. केंद्र सरकारने मात्र त्याचे काटेकोरपणे पालन केले नाही त्यामुळं देशात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरेकर काय बोलतात, मुख्यमंत्री काय टीका करतात यापेक्षा आज लोकांचे जीव जातात त्याला केंद्र जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button