ते आमचे लोक नाहीत!, शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हिसाचाराची जबाबदारी झटकली

ते आमचे लोक नाहीत!, शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हिसाचाराची जबाबदारी झटकली

दिल्ली : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा ठरलेला मार्ग सोडून पोलीसांना न जुमानता दिल्लीत घुसलेल्या शेतकरी आंदोलनातील निदर्शकांनी सुमारे तीन तास दिल्लीत हिंसाचार केला. मात्र, हे आंदोलन करणाऱ्या सुमारे ४० शेतकरी संघटनांनी – हिंसाचार करणारे आमचे लोक नाहीत, असे म्हणून हिंसाचाराची जबाबदारी झटकली.

शेतकरी आंदोलनाअंतर्गत आज ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. यामध्ये दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, सिंघू, टिकारी बॉर्डर आणि इतर ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी हिंसाचार केला. संयुक्त किसान मोर्चाने या हिंसाचाराचा निषेध केला.

संयुक्त किसान मोर्चाने (Samyukt Kisan Morcha) निवेदन प्रकाशित करून ट्रॅक्टर रॅलीला शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले. या आंदोलनामध्ये झालेल्या हिंसक घटनांचा विरोध करत आहे. या घटनांसाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेतली.

आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने घडलेल्या हिंसेदंर्भात म्हटले आहे की, सर्व प्रयत्नानंतरही काही संघटना आणि व्यक्तींनी नियोजित मार्गाचे आणि नियमांचे उल्लंघन केले. निंदनीय कृत्य केले. असामाजिक तत्वांनी शांततापूर्ण आंदोलनामध्ये घुसखोरी केली. आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करुन आंदोलनाला नुकसान होऊ द्यायचे नाही असा आमचा हेतू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER