
पुणे : भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) याना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यावर खडसे यांनी – मी चौकशीसाठी हजर होईन; सीडीचे नंतर बघू अशी, धमकीवजा प्रतिक्रिया दिली. यावर भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खडसेंना टोमणा मारला, न फुटणारे बॉम्ब टाकत आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने खडसेंना नोटीस बजावली आहे. एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता चौकशी साठी ईडीने नोटीस बजावली आहे. मात्र, चौकशी कोणत्या प्रकरणाची हे अजून स्पष्ट झालेले नाही.
भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताना खडसे म्हणाले होते, मी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आता ईडीचा ससेमिरा माझ्यामागे देखील लावतील, मात्र, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला