‘खर सरकार कोणाचे हे त्यांनाही माहिती’, मनसेची उपरोधिक पोस्टरबाजी

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray

मुंबई :- ‘कलर्स’ (Colors) वाहिनीच्या ‘बिग बॉस’ (Big Boss) चे १४वे पर्व सध्या सुरू जोशात सुरू आहे. या कार्यक्रमातील एका भागात राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर जान कुमार सानूच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला गेला. ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान झाल्याप्रकरणी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी २४ तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर ‘वायकॉम 18’ ने माफी मागितली आहे. ‘वायकॉम 18’ ने याबाबतचे पत्र मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे. पण राज ठाकरे यांना मराठीत तर उद्धव ठाकरे यांना इंग्रजीत माफीनामा पाठवण्यात आला आहे. याच कारणावरुन आता राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहे.

सोशल मीडियावर (Social Media) सध्या मनसे कार्यकर्त्यांकडून एका पोस्टरचा फोटो शेअर केला जात आहे. या पोस्टरमध्ये लिहिलेल्या वाक्यांवरुन मनसे आणि शिवसेनेमध्ये राजकीय वाद उफाळू शकतो. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’. कलर्स वाल्यांना पण माहीत आहे खरं सरकार कुठे आहे ते”, असं पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर २७ ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. आम्ही या आक्षेपांची तात्काळ नोंद घेतली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत.

मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER