आपल्या पतीकडून महिलांना अपेक्षित असतात ‘या’ गोष्टी

indian-couple

प्रत्येक स्त्री आपल्या पतीकडून काही गोष्टींची अपेक्षा करत असते. संपत्तीपेक्षा विवाहित स्त्रीला आपल्या पतीचे प्रेम महत्वाचे असते. पतीचा थोडा वेळ, नात्याला टिकवून ठेवण्यासाठी काहीसा समजूतदारपणा किंवा कुठल्या अडचणीत असल्यास त्याची साथ, अशा लहान लहान गोष्टी स्त्रियांना आपल्या पतीकडून अपेक्षित असतात. जर तुम्हाला तुमच्या पत्नीला समजून घ्यायचे असेल आणि आनंदी संसारासाठी नातं अधिक घट्ट करायचे असेल, तर पत्नीला तुमच्याकडून असलेल्या या अपेक्षा नक्की पूर्ण करा.

ही बातमी पण वाचा : आपल्या जोडीदाराच्या हाथ पकडण्याच्या पद्धतीने ओळखा तुमच प्रेम किती अटूट आहे

१. पुरेसा वेळ द्या:
विवाहित जीवनाचा विचार केला तर, वेळ हा अत्यंत महत्वाचा विषय असून पतीने पत्नीला आपल्या व्यस्त कामातून थोडा वेळ दिला पाहिजे. तुमचा दिवसातून काढलेला हा थोडा वेळ देखील तुमच्या पत्नीला खुश करू शकतो. पतीचा पुरेसा वेळ न मिळाल्यास काही महिला दुखी होऊन नैराशाजनक परिस्थितीत जाऊ शकतात.

२. पत्नीचे कौतुक करा:
आजच्या काळातल्या महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. त्या घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सुरळीतपणे सांभाळतात. अशावेळी पतीकडून आपले कौतुक व्हावे, अशी अपेक्षा प्रत्येक पत्नीला असते. जर तुम्ही तिचे थोडे कौतुक केले, तर ती आनंदी होते.

ही बातमी पण वाचा :  म्हणून वधू- वर मध्ये अंतर असणे गरजेचे

३. पत्नीशी चेष्टा/मस्करी करा:
विवाहित जीवनाला सुरळीतपणे आणि आनंदाने चालविण्यासाठी पती-पत्नीच्या नात्यात चेष्टा, मस्करी सारख्या गोष्टींना महत्वाचे स्थान आहे. परंतु, चेष्टा/मस्करीची काही मर्यादा असते, ती न ओलांडता कधी-कधी थोडा वेळ काढून एकमेकांसोबत मस्करी करणे  तुमच्या नात्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

४. जवळीकता:
मिठी, अनपेक्षित फोन कॉल आणि त्यावर आय लव यू अशा छोट्या-छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असून तुमच्या पत्नीला त्वरित आनंदी करू शकतो. त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होण्यास मदत होते.

ही बातमी पण वाचा : या राशीचे पुरुष असतात अधिक रोमँटिक आणि प्रामाणिक