मिरजेतून सुटणाऱ्या या सहा रेल्वेगाड्या होणार बंद

रेल्वेचे नवीन वेळापत्रक 1 डिसेंबरपासून जाहीर होणार आहे. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही त्या बंद करण्यात येणार आहेत. अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे कमी करून त्यांची गती देखील वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवासी मिळत नसल्याने पूर्वी रेल्वे राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस मिरज कोल्हापूर (Miraj Kolhapur)दरम्यान पूर्वीच रद्द केली आहे.

बंद करण्यात येणाऱ्या गाड्या अशा : कोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोल्हापूर-मनगुरू बेळगाव येथून सोडण्यात येणार आहे.

मिरज-पुणे रेल्वे मार्गावर नांद्रे-भिलवडी रेल्वे पुलाखाली भराव दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरून धावणारी कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस दि. 23 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहेत. नव्याने सुरू झालेली हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस दि. 22 व दि. 23 रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच मडगाव निजामुद्दीन, यशवंतपूर-निजामुद्दीन, म्हैसूर-अजमेर, बंगळुरू-जोधपूर या गाड्या मिरज-कुर्डूवाडी-दौंड मार्ग वळविण्यात आल्या आहेत. दि. 19 रोजी गोदिया येथून सुटलेली महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे पर्यंत धावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER