या ‘जय’ आणि ‘विरू’ मुळं संगणक क्षेत्रात आली क्रांती !

Bill Gates and Paul Allen

आज तंत्रज्ञानाने केलेली प्रगती आपण सगळे बघतोच आहोत. संपूर्ण जग बोटाच्या एका क्लिक वर आपल्यासाठी उपलब्ध आहे. पण ह्या मागे ज्या दोन प्रमुख माणसांचा हात आहे ती आपल्याला माहीत आहेत का ? जगाला कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचं वेड लावणार्‍या दोन वेड्यांची नावं आहेत बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स ! या दोघांमधल्या स्पर्धेने जगाला झटपट तंत्रज्ञान पुरवलं आणि आज आपण टेक्नॉलॉजीच्या ह्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. याच स्पर्धेची ही कहाणी !

१९७४ मध्ये न्यू मेक्सिकोमधील एका कंपनीने लावलेल्या शोधापर्यंत जगाला पर्सनल कॉम्प्युटरची ओळख नव्हती. त्यांनी शोधलेलं ‘अल्टेअर ८८००’ मात्र आज आपण वापरत असलेल्या कॉम्प्युटर पेक्षा खूप वेगळं होतं. त्याला किबोर्ड किंवा माऊस नव्हता, शिवाय त्याची ऑपरेटिंग सिस्टिमही प्रचंड किचकट होती.

‘अल्टेअर’ लोकांमध्ये आलं असलं तरीही त्याला प्रोग्रामिंग लॅंगवेजची गरज आहे हे ऑक्सफर्ड युनिवर्सिटीत (Oxford University) शिकत असलेल्या बिल गेट्स आणि पॉल अ‌ॅलन या दोन मित्रांनी ओळखलं आणि अल्टेअरला प्रोग्राममिंग लॅंगवेज देण्याचा निर्णय घेतला आणि अल्टेअर या पर्सनल कॉम्प्युटरसाठी पहिलं सॉफ्टवेअर विकलं गेलं.

बिल गेट्स आणि पॉल अ‌ॅलन जगाला कॉम्प्युटर अधिक सोप्पं करून देण्याच्या प्रयत्नात असले तरीही असा विचार करणारे ते दोघंच नव्हते. कॅलिफोर्निया मध्ये अजून दोन मित्र स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनियाक अजून सुधारित कॉम्प्युटरच्या शोधात व्यस्त होते.

स्टीव्ह वाझनियाकने अल्टेअरसारखंच माइक्रोप्रॉसेसर वापरुन एक नवं कॉम्प्युटर बनवलं पण यात दोन नवी उपकरणं जोडली गेली होती. कॉम्प्युटरला आज्ञा देण्यासाठी त्याला किबोर्ड जोडण्यात आला होता आणि दिलेल्या आज्ञावर होणारी प्रक्रिया आपण सहजपणे मॉनिटरवर पाहू शकत होतो.

तिकडे पॉल अ‌ॅलन आणि बिल गेट्सने मिळून न्यू मेक्सिकोमधल्या आल्बकर्की शहरात कॉम्प्युटर प्रोग्राम बनवणारी मायक्रोसोफ्ट कंपनी सुरू केली होती. स्टीव्ह वाझनियाक आणि स्टीव्ह जॉब्सही त्यांनी शोधलेल्या कॉम्प्युटरवर मेहनतीने काम करत होते. त्यांनी कॅलिफोर्निया मध्ये इतर कॉम्प्युटर पेक्षा नवं आणि वेगळं कॉम्प्युटर बनवणारी ‘अ‌ॅपल’ कंपनी सुरू केली.

अ‌ॅपलने बनवलेल्या कॉम्प्युटर्समध्ये किबोर्ड, मॉनिटर आणि रंगीत ग्राफिक्स असले तरीही वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीटसारख्या व्यावसायिक वापरतल्या गोष्टी नाहीत हे बिल गेट्सने ओळखलं आणि मायक्रोसोफ्टने अ‌ॅपलसाठी व्यावसायिक वापरातले सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात केली. अॅपलने त्यांच्या मॅकींटॉश कॉम्प्युटर मध्ये नवं तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्या कॉम्प्युटरला मोठे कोड लिहून आज्ञा देण्याची गरज नव्हती, माऊस हे नवं उपकरून वापरुन अनेक गोष्टी सोप्या झाल्या होत्या. कॉम्प्युटरवर दिसणार्‍या प्रतिमा किंवा चिन्हांवर क्लिक करून कॉम्प्युटरला आज्ञा देणार्‍या याच कार्यप्रणालीला ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतात.

ही प्रणाली बघून मायक्रोसॉफ्टने त्यांची स्वतःची विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली आणि यामुळे अ‌ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट मधल्या नात्याला तडा गेला.

मायक्रोसॉफ्ट प्रगतिच्या दिशेने एकामागे एक यशस्वी पाऊलं ताकत असतानाच स्टीव्ह जोब्सला मात्र अ‌ॅपलमध्ये विरोधक तयार होऊन कंपांनीच्या बोर्डाने कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

अ‌ॅपलमधून बाहेर पडून स्टीव्ह जॉब्सने NeXT ही कंपनी सुरू केली पण हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. नंतर PIXAR या कंपनीत पैसे गुंतवून स्टीव्ह जॉब्स पुन्हा पायावर उभा राहिला.

१० वर्ष अ‌ॅपलमधून स्टीव्ह जॉब्स बाहेर होता. आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चाललेल्या अ‌ॅपलमध्ये १९९६ मध्ये स्टीव्ह परत आला. त्यानंनातर वर्षभरातच त्याने मायक्रोसॉफ्ट बरोबर भागीदारी जाहीर केली ज्यात मायक्रोसॉफ्टची १५ कोटी डॉलरची गुंतवणूक होती.

त्यानंतर स्टीव्ह जोब्सच्या अ‌ॅपलने जगाला आयपॉद, आयफोन आणि आयपॅड सारखी उपकरणं दिली.

बिल गेट्सच्या मायक्रोसोफ्ट कंपनीने जग बदललेलं दिसत असलं तरीही स्टीव्ह जोब्स बरोबा असलेली स्पर्धाही याला महत्वाचं कारण होती.

जवळपास एकाच वयाचे असलो आणि दोन वेगळ्या कंपन्या चालवत असलो तरीही आमच्या मनात एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता असं बिल गेट्स आजही सांगताना दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER