या नायिकांनी सौंदर्य वाढवण्यासाठी केले ऑपरेशन

heroines performed operations to enhance beauty

बॉलिवूडमध्ये नायिकांनी सुंदर दिसणे आवश्यकच असते. एखादी मुलगी सुंदर नसेल आणि तीने जर नायिका बनण्याचे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण होणे 99.99 टक्के अशक्य असते. एखादीच मुलगी सौंदर्यापेक्षा अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करते. तर कधी कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून काही सिनेमे केल्यावर नायिका आणखी सुंदर दिसावे म्हणून शरीरावर विविध ऑपरेशन करतात. यामुळे काही नायिकांचे सौंदर्य आणखी खुलते तर काही नायिकांचा चेहराच बिघडून जातो. त्यामुळे ऑपरेशन का केले असा प्रश्न त्यांना पडतो. याची आठवण आज येण्याचे कारण म्हणजे चीनी अभिनेत्री आणि गायिका गाओ लियू (Chinese actress, singer Gao Liu) ने तिचे सौंदर्य आणखी खुलावे म्हणून नाकाचे ऑपरेशन केले. मात्र तिचे हे ऑपरेशन अयशस्वी ठरली आणि तिच्या नाकाचा खालचा भाग चक्क काळा पडला. बॉलिवूडमधील काही नायिकांनी असे ऑपरेशन केले आणि त्यांचे सौंदर्य पूर्वीपेक्षा जास्त खुलवले. अशाच काही नायिकांवर एक नजर-

ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला आणि त्यानंतर तिची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. मिस वर्ल्ड झाली असतानाही आपले सौंदर्य आणखी खुलावे म्हणून ऐश्वर्याने नाक आणि चेहऱ्यासाठी ब्यूटी सर्जरीची मदत घेतली होती. एकदा करण जोहरच्या शोमध्ये अभिनेता इमरान खानने ऐश्वर्या रायला प्लॅस्टिक म्हणून तिला हिणावले होते.

ऐश्वर्या प्रमाणे प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. मात्र प्रियांकानेही तिचे सौंदर्य आणखी खुलावे म्हणून नाक आणि ओठांचे ऑपरेशन केले होते. याशिवाय शरीरावर आणखी काही क्लिनिकल ट्रीटमेंट्सही तिने केल्या होत्या. प्रियांकाने तिच्या जीवनावर आधारित ‘अनफिनिश्ड’ पुस्तक लिहिले असून यात तिने याबाबत खुलासा केला आहे. प्रियांका म्हणते, या शस्त्रक्रिया केल्यानंतर माझ्यावर अनेक जण हसले होते आणि माझी मस्करीही केली जात होती. खरे तर प्रियांका नाकाच्या एका समस्येसाठी डॉक्टरकडे गेली होती आणि ऑपरेशननंतर तिच्या नाकाचा शेपच बदलला होता. त्यामुळे प्रियांका निराश झाली होती आणि तिचा आत्मविश्वासही संपुष्टात आला होता. नाक पुन्हा चांगले व्हावे म्हणून तिला दोन वेळा ऑपरेशन करावे लागले होते. त्यानंतर तिने स्वतःला सावरले होेते.

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) रोनित रॉय आणि रोहित रॉय या दोन भावांसोबत सिनेमा साईन करून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. तिचे सुरुवातीचे रुप नायिकेला साजेसे नव्हते. बाजीगरमध्ये तिला पाहिल्यानंतर याची कल्पना येते. त्यानंतर काही हिट सिनेमे दिल्यानंतर शिल्पाने दोन वेळा तिच्या नाकाचे ऑपरेशन करून चेहऱ्याचे सौंदर्य आणखी खुलवले आणि रंगही गोरा करून घेतला होता. या ऑपरेशननंतर शिल्पाचे नशीब खुलले होते आणि तिने अनेक सिनेमात नायिका म्हणून काम तर केलेच आजही ती सक्रिय आहे.

कॅटरीना कैफ (Katrina Kaif)आज बॉलिवूडमध्ये सुंदर नायिका म्हणून ओळखली जाते. पण ‘बूम’ सिनेमातील कॅटरीना आणि आताची कॅटरीना यात फरक स्पष्ट जाणवतो. कॅटरीनाने कटरीना कैफने चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर कॅटरीनाने ‘लिप फिलर्स’ आणि ‘नोज जॉब’ही केल्याचे सांगितले जाते.

बॉलिवूडमध्ये सध्या कंगना रनौत खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावरही कंगना चांगलीच सक्रिय आहे. कंगनाचेही सुरुवातीचे रूप आणि आताचे रुप यात खूप फरक नक्कीच जाणवेल. कंगनानेही अगोदर लिप सर्जरी आणि नंतर ब्रेस्ट इंप्लांटही केल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर कंगनाने तिच्या पापण्यांचीही सर्जरी केल्याचे बॉलिवूडमध्ये म्हटले जाते.

बॉलिवूडची अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी जी नुकतीच आई झाली आहे त्या अनुष्का शर्माने (Anushka Sharma)शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’तून रुपेरी पडद्यावर प्रवेश केला होता. या सिनेमात अनुष्काचे ओठ वेगळे होते. या सिनेमानंतर ती करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आली होती तेव्हा तिला हसताना खूप त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. कारण तेव्हा तिच्या ओठांचा आकार पूर्णपणे बदललेला होता आणि त्यामुळे तिचा चेहराही बदलला होता. त्यामुळे ती खूप ट्रोल झाली होती. एवढेच नव्हे तर तिला ‘डोनाल्ड डक’ म्हणूनही बोलले जाऊ लागले होते. अनुष्काने लिप सर्जरी केल्यामुळेच तिचा चेहरा बदलला होता.

याशिवाय आयशा टकिया, नर्गिस फाखरी, वाणी कपूर आणि कमस हसनची मुलगी श्रुती हसन यांनीही चेहऱ्याचे सौंदर्य वाढावे म्हणून ऑपरेशन केल्याचे सांगितले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER