फक्त पाचवी ते बारावीपर्यंतच शिकलेल्या आहेत या नायिका

These heroines have learned only from 5th to 12th

मुलगी शिकली प्रगती झाली असे म्हणतात. त्यामुळे मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घेतले की ती दोन घरांचा उद्धार करते असेही म्हटले जाते. त्यामुळेच मुलींनी शिकावे म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढल्या. मुलींनी शिक्षण घेऊन अंतराळापर्यंत झेप घेतली. पण बॉलिवुड नायिकांना (Bollywood Heroine) जी लोकप्रियता आणि पैसा मिळतो तसा उच्च शिक्षित मुलींना मिळत नाही. बॉलिवुडमध्ये काम करून कोट्यावधींची कमाई करणाऱ्या या नायिकांचे शिक्षण (Education) किती झाले आहे हे तुम्हाला कळले तर चकितच व्हाल.

पण एक आहे तुमचे शिक्षण कमी असले तरी चालेल, चेहरा सुंदर हवा, फाडफाड इंग्लिश बोलता यायला पाहिजे आणि आत्मविश्वास हवा. या तीन गोष्टींच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता आणि हेच या नायिकांनी दाखवून दिले आहे.

सध्याची आघाडीची नायिका कॅटरीना कैफ (Katrina Kaif) किती शिकली आहे हे तुम्हाला ऐकून धक्का बसेल. मानसिक तयारी ठेऊन ऐका. कॅटरीना आयुष्यात कधीही शाळेत गेली नाही. धक्का बसला ना. पण हे खरे आहे. कॅटरीनाला आपल्या आई-वडिलांसोबत सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असल्याने ती शाळेतच गेली नाही. तिला घरीच शिकवणी लावण्यात आलेली होती. मात्र लहानपणापासूनच ती धाडसी असल्याने आणि नायिका होण्याचे स्वप्न असल्याने तिने त्याकडे लक्ष दिले. मॉडेलिंग करता-करता ती बॉलिवुडमध्ये आली आणि दुय्यम दर्जाची कामे करू लागली. नंतर मात्र तिने स्वतःला बदलले आणि ती आघाडीची नायिका झाली.

बॉलिवुडच्या नायिकांमध्ये सगळ्यात कमी शिकलेली नायिका कोण असेल तर ती आहे करिश्मा कपूर. करिश्माचे शिक्षण ऐकला तर तुम्ही म्हणाल असे कसे. पण हे आहे खरे. करिश्मा फक्त पाचवी पास आहे. करिश्मा पाचवी पास झाली आणि सहावीत गेली. परंतु तेव्हापासूनच तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिने पुन्हा शाळेेचे तोंडही पाहिलेले नाही. बॉलिवुडमध्ये तिने पदार्पण केल्यानंतर 90 च्या दशकात ती आघाडीची नायिका झाली होती.

दीपिका पदुकोनही (Deepika Padukone) फक्त बारावी पास आहे. दीपिकाने बेंगलोरच्या सोफिया हायस्कूलमधून बारावीची परीक्षा दिली. परीक्षा पास झाल्यावर तिने बेंगलोरच्याच माउंट कारमेल कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला पण मॉडेलिंगच्या ऑफर आल्या आणि तिने शिक्षण सोडून दिले.

निक जोनासबरोबर (Nick Jonas) लग्न करून हॉलिवुडमध्येही लोकप्रिय झालेली प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra) फक्त बारावी पास आहे. प्रियांकाला खरे तरक्रिमिनल सायकोलॉजिस्ट बनायचे होते. यासाठी तिने मुंबईतील जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. परंतु ती मिस इंडिया झाली. त्यानंतर तिच्याकडे मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या आणि नंतर बॉलिवुडमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे तिने पुढे शिक्षणच घेतले नाही.

आलिया भट्टही (Aalia Bhatt) फक्त बारावी पास आहे. आलियाने आपले शिक्षण जुहू येथील जमनाबाई नरसी शाळेतून घेतले. आलिया कधीच कॉलेजला गेली नाही. शाळेत असतानाच तिने बॉलिवुडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता आणि बारावीत असतानाच तिने चित्रपटात काम करण्यास सुुरुवात केली होती. आज ती आघाडीची नायिका झाली आहे.

सध्या सगळ्या बॉलिवुडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारी कंगना रनौत (Kangana Ranaut) तर बारावीही पास होऊ शकलेली नाही. बारावीत नापास झाल्यानंतर तिने पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय रद्द केला आणि बॉलिवुडमध्ये आली. तिला तर इंग्रजीही येत नव्हते. परंतु मुंबईला आली आणि कोणीही गॉडफादर नसताना आत्मविश्वासाच्या बळावर ती पुढे आली. मुंबईत येऊन तिने आपले इंग्रजीही सुधारले. आज तिच्याकडे घताना या गोष्टीवर कोणाचा विश्वासही बसणार नाही.

अनिल कपूरची (Anil Kapoor) मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) खूप वर्ष बॉलिवुडमध्ये काम करेल असे वाटत होते. परंतु काही यशस्वी चित्रपट देऊन ती लग्न करून संसारात मग्न झालेली आहे. सोनमनेही मुंबईतील आर्य विद्या मंदिरमधून बारावीपर्यंतच शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला पण मध्येच शिक्षण सोडून ती बॉलिवुडमध्ये आली. सोनमने एकदा सांगितले होते, शिक्षण पूर्ण करण्यासाठी चार वर्ष थांबण्याची माझी तयारी नव्हती म्हणून मी शिक्षण सोडले आणि बॉलिवुडमध्ये प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER